Showing posts with label गद्द्य. Show all posts

March 04, 2011
March 01, 2011
थांब (संदीप खरे)
एका साध्याशा प्रसंगाच्या निमित्तानं दोघांच्या मूळ प्रवृत्तींविषयी ही कविता केवढं बोलते! जगताना नकळत आपण जे अनेकदा अनुभवतो, ते असं ती वेचून दाखवते! तो हरणार हे त् याला कळलेलं...ती जिंकणार हे तिला कळलेलं..पण कुस्ती थांबते...नव्हे ती थांबवते...आणि मग त्यावर काही चर्चादेखील होत नाही!
हा लेख वाचण्यापूर्वी विनंती आहे की, प्रथम याच्या सोबत असलेली कविता आधी वाचावी...आणि तीही मी सांगतो तशी वाचावी. प्रथम "तो'ची कविता वाचावी आणि मग लगेचच " ती'ची कविता!
कवितेचा अगदी वेगळा आकृतिबंध उलगडणारी ही हेमंत जोगळेकर यांची कविता. एकच घटना दोघांच्या दृष्टिकोनातून मांडलेली! आकृतिबंधाच्या दृष्टिकोनातून तर ही कविता मला वेगळी वाटतेच; पण कवितेचा आशयही शब्दात मांडायला अतिअवघड असा! कोण आहेत हे दोघं? ज्याला आपण पौगंडावस्था म्हणतो, त्या वयाच्या आसपासचे हे दोघं...शेजारी शेजारी राहणारे, लहानपणापासून एकत्र खेळणारे, भांडणारे असे! मैत्रीचं हे निर्व्याज नातं; पण वय बेटं आता वाढतं आहे! मुलांपेक्षा मुली लवकर मोठ्या होतात, असं म्हणतात. फक्त मानसिकदृष्ट्याच नव्हे तर शारीरिकदृष्ट्याही, ताकदीनुसारही त्या झपाट्यानं मोठ्या होतात. मुलांची वाढ सर्वच दृष्टीने हळू! आणि म्हणून बदललेल्या संवेदना, आकलन मुली जितक्या झटकन टिपतात, तितकी मुलं टिपू शकत नाहीत!
या कवितेतली ही मुलगीही अशी नुकतीच वयात येऊ लागलेली. तिला स्वतःला हे बदल जाणवू लागले आहेत. आईनेही "आता यापुढे...' असं म्हणून अनेक सूचना दिलेल्या आहेत. "असं अजागळासारखं बसायचं नाही' पासून ते "मुलांशी दंगामस्ती करायची नाही', "कुणी काही देतो म्हणून बोलावलं तर उगीच जायचं नाही,' "शाळा सुटल्यावर तडक घरी यायचं; सं ध्याकाळचं रेंगाळायचं नाही उगीच!'पर्यंत... हे सारं तिच्या डोक्यात आहे. मोठेपण खुणावतंय आणि बालपण हात धरून अजून मागं खेचतंय! आणि म्हणूनच तर त्यानं "कुस्ती खेळू या' म्हटल्यावर आधी "नाही, नाही' म्हणत का होईना पण ती तयार झाल्येय! एकाच वयाचे आहेत दोघं...पण तो तिच्यासमोर थोडा किरकोळ, शक्तीत थोडा कमी असा! आणि हे ठाऊक आहे तिला! कुस्तीला तयार झाली ती "नाही, नाही' म्हणत; पण एकदा कुस्ती सुरू झाल्यावर मात्र भारी पडते आहे ती त्याला! तिचा जोर एवढा आहे की, हाप्पॅंटमधल्या त्याच्या लुकड्या तंगड्या थरथरायला लागल्या...श्वास गरम झाले...डोळे कोपऱ्यात गेले! अजून थोडा नेट आणि तो हरणार...मुलगा असून एका मुलीकडून कुस्तीत हरणार? सहन होत नाहीए त्याला; पण बळ कमी पडतंय...दात-ओठ खाऊन त्याचा पुरुषी अहंकार जोर लावतोय! अजून थोडा नेट आणि तो हरणार, हे तिला जाणवत होतं...पण निश्चित झाल्याक्षणी ती एकदम म्हणते ः "थांब!' कुस्ती थांबत, कुणीच जिंकत नाही, पण मुख्य म्हणजे तो "हरत' नाही! अचानक आलेलं हे "थांब' आलं कुठून?
मला वाटतं की, सदैव अनाकलनीय राहिलेल्या स्त्रीतत्त्वातून हे योग्य वेळी सुचलेलं "थांब' आलं असावं! आदिकाळापासून हे स्त्रीतत्त्व कोडं म्हणून उभं आहे! "तगून' राहण्यासाठी जे जे लागतं, ते ते सारं निसर्गानंच तिच्या ताब्यात दिलं आहे. फक्त निर्मिती नव्हे; तर स्वतः तगून इतरांचं पालनपोषण करण्याचं अफाट सामर्थ्य तिच्या ठाई आहे! "गॉन विथ द विंड'म धली नायिका स्कार्लेट ओ हारा; अनेक विपत्ती तिच्यावर येतात...चहूबाजूंनी समस्या...घर-दार दुरावतं, प्रेम दुरावतं, माणसं दुरावतात आणि अशाच एका निकराच्या क्षणी आभाळाकडं पाहत ती ओरडते ः "मी अशी हरणार नाही...मी इथे टिकून राहीन..' जगण्यातली सारी झुंज तिच्यात एकवटते! या तथाकथित "पुरुषप्रधान' जगात आपण कितीदा तरी पाहतो की, आपत्तीच्या काळात पुरुष कोलमडतो...पण हळव्या, नाजूक मनाच्या स्त्रिया मात्र ताठ उभ्या राहतात; नव्हे, त्यालाही हात धरून उभ्या ठेवतात! बुद्धी, सौंदर्य, कौशल्य, कारुण्य, कोमलता, प्रसंगी कठोरता, सोशिकता आणि परिस्थितीची जबरदस्त अंगभूत समज...या साऱ्यांतून ती जगण्याचा, अस्तित्वाचा आधार बनून उभी राहते - कधी आई म्हणून, कधी बायको म्हणून, कधी बहीण, कधी मैत्रीण, कधी प्रेयसी म्हणून! आणि या साऱ्याच्या पार तिला जे कळतं, ते पुरुषांना कधीही न उमगणारं! तिला कळतं की जिंकता येतं म्हणून दर वेळेला जिंकायचंच, असं नसतं!! खरं तर आपल्यावरच अवलंबून असलेल्या "त्या'च्या मधला तो पुरुषपणाचा अहंकारही प्रसंगी हार खाऊनही ओंजळीतल्या दिव्यासारखा जपायचा असतो! सामर्थ्याच्या अंतरंगातला हा प्रेमाचा, वात्सल्याचा सोशिकतेचा हळुवार झरा पुरुषी मनाला कसा उमगणार?! एका साध्याशा प्रसंगाच्या निमित्तानं दोघांच्या मूळ प्रवृत्तींविषयी ही कविता केवढं बोलते! जगताना नकळत आपण जे अनेकदा अनुभवतो, ते असं ती वेचून दाखवते! तो हरणार हे त्याला कळलेलं...ती जिंकणार हे तिला कळलेलं..पण कुस्ती थां बते...नव्हे ती थांबवते...आणि मग त्यावर काही चर्चादेखील होत नाही! त्याचं झगडणं, जिंकण्यासाठीची तडफड, अहंकार ती अलगद तिच्या केवळ स्त्रीलाच शक्य अशा अवधानाच् या, मोठेपणाच्या ओंजळीत घेते! स्त्रियांना आईपणाचं वरदान असतं म्हणू त्या अशा असतात; की स्त्रिया अशा असतात म्हणून देव त्यांना आईपणाचं वरदान देतो?

December 30, 2010
ई साहित्य संमेलनं
ई-संमेलन कार्यक्रम पत्रिका
आपली साहित्य संमेलनं गाजतात ती साहित्येतर कारणांनीच. ज्या विषयांवर संमेलनांमध्ये चर्चा होतात, त्यांचे पडसाद संमेलनाच्या मंडपाबाहेर उमटल्याचे फारसे ऐकू येत नाही. म्हणूनच साहित्यातील समकालीन मुद्द्यांवर निर्भिड चर्चा घडावी आणि अशा विषयांना हक्काचं व्यासपीठ मिळावं यासाठी युनिक फीचर्स (http://uniquefeatures.in/) आपल्या नव्या वेबसाइटवर ३१ डिसेंबर २०१० ते तीन जानेवारी २०११ दरम्यान पहिलं अनुभव ई-साहित्य संमेलन भरवत आहे.
या पहिल्या ऑनलाइन साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत
परिसंवाद, मुलाखती, कविकट्टा अशी मुख्य संमेलनातील सगळी वैशिष्ट्ये या ई-संमेलनातही असतील. अनेक ज्येष्ठ लेखकांनी समकालीन साहित्यातील कळीच्या मुद्द्यांवर थेट भूमिका घेतली आहे. संमेलनाध्यक्षांचे भाषण आणि तसेच काही साहित्यिकांचे विचार व्हिडिओमधूनही पाहता येतील.
अशी आहे या संमेलनाची कार्यक्रमपत्रिका.
शुक्रवार, ३१ डिसेंबर २०१०
परिसंवाद
सहभाग- रंगनाथ पठारे, दीनानाथ मनोहर, अवधूत परळकर
समारोप- वसंत आबाजी डहाके
परिसंवाद
सहभाग- कविता महाजन, अरूण भालेराव, प्रसाद शिरगावकर
समारोप- अच्युत गोडबोले
कथाकार सानिया यांच्याशी संजय भास्कर जोशी यांनी
रविवार, दोन जानेवारी २०११
सहभाग- अरूण खोरे, शंकर सारडा, जयदेव डोळे
समारोप- अरूण साधू
सोमवार, तीन जानेवारी २०११
सहभाग- निळू दामले, संजय जोशी, अविनाश कदम
समारोप- सदा डुंबरे
काकडे, सतीश सोळांकूरकर, वर्जेश सोळंकी, श्रीकांत देशमुख, संगीता बर्वे, प्रशांत असनारे, प्रफुल्ल शिलेदार, अंजली कुलकर्णी, बालाजी इंगळे अशा
आजच्या आघाडीच्या कवी-कवयित्रींच्या कवितांचा आस्वाद या ई-संमेलनात रसिकांना घेता येईल. एवढेच नव्हे तर वाचकांना, नवोदित कवींना या
वेबसाइटवर आपल्या कविता प्रकाशित करता येतील, अशीही सोय आम्ही केली आहे.
तुम्हीही या ई- साहित्य संमेलनात प्रत्यक्ष सहभागी व्हा.
या पहिल्या ऑनलाइन साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत
ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी.
या संमेलनाचे उद्घाटन ३० डिसेंबर २०१० रोजी संध्याकाळी ५ वाजता पत्रकार संघ येथे होत आहे. यावेळी रत्नाकर मतकरी यांच्यासोबत एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत हेदेखील उपस्थित असतील.परिसंवाद, मुलाखती, कविकट्टा अशी मुख्य संमेलनातील सगळी वैशिष्ट्ये या ई-संमेलनातही असतील. अनेक ज्येष्ठ लेखकांनी समकालीन साहित्यातील कळीच्या मुद्द्यांवर थेट भूमिका घेतली आहे. संमेलनाध्यक्षांचे भाषण आणि तसेच काही साहित्यिकांचे विचार व्हिडिओमधूनही पाहता येतील.
अशी आहे या संमेलनाची कार्यक्रमपत्रिका.
शुक्रवार, ३१ डिसेंबर २०१०
रत्नाकर मतकरी यांचे अध्यक्षीय भाषण
परिसंवाद
साहित्येतर दबावापुढे लेखकांनी शरणागती पत्करली आहे.
सहभाग- रंगनाथ पठारे, दीनानाथ मनोहर, अवधूत परळकरसमारोप- वसंत आबाजी डहाके
ज्येष्ठ कवी नामदेव ढसाळ यांची प्रशांत खुंटे यांनी घेतलेली मुलाखत
शनिवार, एक जानेवारी २०११
परिसंवाद
इंटरनेटमुळे साहित्याचा पैस वाढतो आहे.
सहभाग- कविता महाजन, अरूण भालेराव, प्रसाद शिरगावकरसमारोप- अच्युत गोडबोले
कथाकार सानिया यांच्याशी संजय भास्कर जोशी यांनी
मारलेल्या दिलखुलास गप्पा
रविवार, दोन जानेवारी २०११
परिसंवाद
वर्तमानपत्रांनी साहित्याला बेदखल केले आहे.
सहभाग- अरूण खोरे, शंकर सारडा, जयदेव डोळेसमारोप- अरूण साधू
नाट्यनिर्मितीची प्रक्रिया उलगडून दाखवणारी नाटककार शफाअत खान यांची रवींद्र पाथरे यांनी घेतलेली मुलाखत.
सोमवार, तीन जानेवारी २०११
परिसंवाद
संमेलनाला मिळणारा एकगठ्ठा पैसा ही चिंतेची बाब आहे का ?
सहभाग- निळू दामले, संजय जोशी, अविनाश कदमसमारोप- सदा डुंबरे
कविता - निमंत्रितांच्या आणि तुमच्या-आमच्यादेखील
कवी कट्ट्यावर तिन्ही दिवस खास वेबसाइटसाठी लिहिलेल्या निमंत्रित कवींच्या कविता वाचता येतील. त्यात सतीश काळसेकर, दासू वैद्य, आसावरीकाकडे, सतीश सोळांकूरकर, वर्जेश सोळंकी, श्रीकांत देशमुख, संगीता बर्वे, प्रशांत असनारे, प्रफुल्ल शिलेदार, अंजली कुलकर्णी, बालाजी इंगळे अशा
आजच्या आघाडीच्या कवी-कवयित्रींच्या कवितांचा आस्वाद या ई-संमेलनात रसिकांना घेता येईल. एवढेच नव्हे तर वाचकांना, नवोदित कवींना या
वेबसाइटवर आपल्या कविता प्रकाशित करता येतील, अशीही सोय आम्ही केली आहे.
तुम्हीही या ई- साहित्य संमेलनात प्रत्यक्ष सहभागी व्हा.
November 04, 2010
सह्याद्री एक्सप्लोरर्स नूतनवर्षविशेषांक -२०१०

https://docs.google.com/fileview?id=0BzEKLdMq7j6qMGQ1NTc5Y2UtOGQzMi00YjdmLTg0YWUtMDZkN2NhOGQwMDE0&hl=en

September 23, 2009
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो....

राजे असा कंटाळा करून चालणार नाही
माझ्याशिवाय तुमच्याशी
खरे कुणीच बोलणार नाही
’गाईड’होण्याची संधीही
मी कशाला हुकवतो?
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो
सुरूवात शिवनेरीपासून?
की,रायगडापासून करायची?
उलटी की सुलटी?
कोणती मळवाट धरायची?
असे कोड्यामध्ये पडू नका,
कुणालाच उपदेश नको,
"आपापसात लढू नका"
तेव्हाही पटले नाही,
आत्ताही पटणार नाही.
मरतील पण सवयीपासून
मागे कुणी हटणार नाही.
म्हातारीच्या मरणाने
काळ बघा कसा सोकावतो?
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो..
Subscribe to:
Posts (Atom)