Showing posts with label कविता. Show all posts
Showing posts with label कविता. Show all posts

March 01, 2011

थांब (संदीप खरे)

एका साध्याशा प्रसंगाच्या निमित्तानं दोघांच्या मूळ प्रवृत्तींविषयी ही कविता केवढं बोलते! जगताना नकळत आपण जे अनेकदा अनुभवतो, ते असं ती वेचून दाखवते! तो हरणार हे त् याला कळलेलं...ती जिंकणार हे तिला कळलेलं..पण कुस्ती थांबते...नव्हे ती थांबवते...आणि मग त्यावर काही चर्चादेखील होत नाही!
 
हा लेख वाचण्यापूर्वी विनंती आहे की, प्रथम याच्या सोबत असलेली कविता आधी वाचावी...आणि तीही मी सांगतो तशी वाचावी. प्रथम "तो'ची कविता वाचावी आणि मग लगेचच " ती'ची कविता!

कवितेचा अगदी वेगळा आकृतिबंध उलगडणारी ही हेमंत जोगळेकर यांची कविता. एकच घटना दोघांच्या दृष्टिकोनातून मांडलेली! आकृतिबंधाच्या दृष्टिकोनातून तर ही कविता मला वेगळी वाटतेच; पण कवितेचा आशयही शब्दात मांडायला अतिअवघड असा! कोण आहेत हे दोघं? ज्याला आपण पौगंडावस्था म्हणतो, त्या वयाच्या आसपासचे हे दोघं...शेजारी शेजारी राहणारे, लहानपणापासून एकत्र खेळणारे, भांडणारे असे! मैत्रीचं हे निर्व्याज नातं; पण वय बेटं आता वाढतं आहे! मुलांपेक्षा मुली लवकर मोठ्या होतात, असं म्हणतात. फक्त मानसिकदृष्ट्याच नव्हे तर शारीरिकदृष्ट्याही, ताकदीनुसारही त्या झपाट्यानं मोठ्या होतात. मुलांची वाढ सर्वच दृष्टीने हळू! आणि म्हणून बदललेल्या संवेदना, आकलन मुली जितक्‍या झटकन टिपतात, तितकी मुलं टिपू शकत नाहीत!

या कवितेतली ही मुलगीही अशी नुकतीच वयात येऊ लागलेली. तिला स्वतःला हे बदल जाणवू लागले आहेत. आईनेही "आता यापुढे...' असं म्हणून अनेक सूचना दिलेल्या आहेत. "असं अजागळासारखं बसायचं नाही' पासून ते "मुलांशी दंगामस्ती करायची नाही', "कुणी काही देतो म्हणून बोलावलं तर उगीच जायचं नाही,' "शाळा सुटल्यावर तडक घरी यायचं; सं ध्याकाळचं रेंगाळायचं नाही उगीच!'पर्यंत... हे सारं तिच्या डोक्‍यात आहे. मोठेपण खुणावतंय आणि बालपण हात धरून अजून मागं खेचतंय! आणि म्हणूनच तर त्यानं "कुस्ती खेळू या' म्हटल्यावर आधी "नाही, नाही' म्हणत का होईना पण ती तयार झाल्येय! एकाच वयाचे आहेत दोघं...पण तो तिच्यासमोर थोडा किरकोळ, शक्तीत थोडा कमी असा! आणि हे ठाऊक आहे तिला! कुस्तीला तयार झाली ती "नाही, नाही' म्हणत; पण एकदा कुस्ती सुरू झाल्यावर मात्र भारी पडते आहे ती त्याला! तिचा जोर एवढा आहे की, हाप्पॅंटमधल्या त्याच्या लुकड्या तंगड्या थरथरायला लागल्या...श्‍वास गरम झाले...डोळे कोपऱ्यात गेले! अजून थोडा नेट आणि तो हरणार...मुलगा असून एका मुलीकडून कुस्तीत हरणार? सहन होत नाहीए त्याला; पण बळ कमी पडतंय...दात-ओठ खाऊन त्याचा पुरुषी अहंकार जोर लावतोय! अजून थोडा नेट आणि तो हरणार, हे तिला जाणवत होतं...पण निश्‍चित झाल्याक्षणी ती एकदम म्हणते ः "थांब!' कुस्ती थांबत, कुणीच जिंकत नाही, पण मुख्य म्हणजे तो "हरत' नाही! अचानक आलेलं हे "थांब' आलं कुठून?
 
मला वाटतं की, सदैव अनाकलनीय राहिलेल्या स्त्रीतत्त्वातून हे योग्य वेळी सुचलेलं "थांब' आलं असावं! आदिकाळापासून हे स्त्रीतत्त्व कोडं म्हणून उभं आहे! "तगून' राहण्यासाठी जे जे लागतं, ते ते सारं निसर्गानंच तिच्या ताब्यात दिलं आहे. फक्त निर्मिती नव्हे; तर स्वतः तगून इतरांचं पालनपोषण करण्याचं अफाट सामर्थ्य तिच्या ठाई आहे! "गॉन विथ द विंड'म धली नायिका स्कार्लेट ओ हारा; अनेक विपत्ती तिच्यावर येतात...चहूबाजूंनी समस्या...घर-दार दुरावतं, प्रेम दुरावतं, माणसं दुरावतात आणि अशाच एका निकराच्या क्षणी आभाळाकडं पाहत ती ओरडते ः "मी अशी हरणार नाही...मी इथे टिकून राहीन..' जगण्यातली सारी झुंज तिच्यात एकवटते! या तथाकथित "पुरुषप्रधान' जगात आपण कितीदा तरी पाहतो की, आपत्तीच्या काळात पुरुष कोलमडतो...पण हळव्या, नाजूक मनाच्या स्त्रिया मात्र ताठ उभ्या राहतात; नव्हे, त्यालाही हात धरून उभ्या ठेवतात! बुद्धी, सौंदर्य, कौशल्य, कारुण्य, कोमलता, प्रसंगी कठोरता, सोशिकता आणि परिस्थितीची जबरदस्त अंगभूत समज...या साऱ्यांतून ती जगण्याचा, अस्तित्वाचा आधार बनून उभी राहते - कधी आई म्हणून, कधी बायको म्हणून, कधी बहीण, कधी मैत्रीण, कधी प्रेयसी म्हणून! आणि या साऱ्याच्या पार तिला जे कळतं, ते पुरुषांना कधीही न उमगणारं! तिला कळतं की जिंकता येतं म्हणून दर वेळेला जिंकायचंच, असं नसतं!! खरं तर आपल्यावरच अवलंबून असलेल्या "त्या'च्या मधला तो पुरुषपणाचा अहंकारही प्रसंगी हार खाऊनही ओंजळीतल्या दिव्यासारखा जपायचा असतो! सामर्थ्याच्या अंतरंगातला हा प्रेमाचा, वात्सल्याचा सोशिकतेचा हळुवार झरा पुरुषी मनाला कसा उमगणार?! एका साध्याशा प्रसंगाच्या निमित्तानं दोघांच्या मूळ प्रवृत्तींविषयी ही कविता केवढं बोलते! जगताना नकळत आपण जे अनेकदा अनुभवतो, ते असं ती वेचून दाखवते! तो हरणार हे त्याला कळलेलं...ती जिंकणार हे तिला कळलेलं..पण कुस्ती थां बते...नव्हे ती थांबवते...आणि मग त्यावर काही चर्चादेखील होत नाही! त्याचं झगडणं, जिंकण्यासाठीची तडफड, अहंकार ती अलगद तिच्या केवळ स्त्रीलाच शक्‍य अशा अवधानाच् या, मोठेपणाच्या ओंजळीत घेते! स्त्रियांना आईपणाचं वरदान असतं म्हणू त्या अशा असतात; की स्त्रिया अशा असतात म्हणून देव त्यांना आईपणाचं वरदान देतो?
 

February 03, 2011

कधीतरी वेड्यागत

तेच तेच पानी अन तीच तीच हवा
आणि तुला बदलही कशाला हवा
जुनेच अजून आहे रीयाजावाचून
गिळलेले आधी सारे पचायला हवे ...
कधीतरी वेड्यागत वागायला हवे ..




Sandeep Khare KADHI TARI VEDYAGAT VAGAYLA HAVE.flv

December 09, 2010

"ई-वर्ले अक्षर २०१०"

"ई-वर्ले अक्षर २०१०". १९ डिसेंबर, दु. ४ ते सा. ७.३०, फर्ग्युसन कॉलेज ऍम्फीथिएटर, पुणे

http://sahityachintan.com/blog/eavrle-akshar-e-duniyetun-wyaspithavar.html
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6904844.cms

November 28, 2010

दिसती माझी माय

हंबरून वासराले चाटती जवा गाय
तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय

आयाबाया सांगत व्हत्या व्हतो जवा तान्हा
दुस्काळात मायेच्या माजे आटला व्हता पान्हा
पिठामंदी पानी टाकून पाजत जाय
तवा मले पिठामंदी दिसती माझी माय

कन्या-काट्या येचायाला माय जाई रानी
पायात नसे वहान तिच्या फिरे अनवानी
काट्याकुट्यालाही तिचं नसे पाय
तवा मले काट्यामंदी दिसती माझी माय

बाप माझा रोज लावी मायच्या मागं टुमनं
बास झालं शिक्षान आता घेऊ दे हाती काम
शिकुनश्यानं कुठं मोठ्ठा मास्तर हुनार हायं
तवा मले मास्तरमंदी दिसतो माझी माय

दारु पिऊन मायेले मारी जवा माझा बाप
थरथर कापे आन लागे तिले धाप
कसायाच्या दावनीला बांधली जशी गाय
तवा मले गायीमंदी दिसती माझी माय

बोलता बोलता येकदा तिच्या डोळा आलं पानी
सांग म्हने राजा तुझी कवा दिसंल रानी
भरल्या डोल्यान कवा पाहील दुधावरची साय
तवा मले सायीमंदी दिसती माझी माय

म्हनून म्हंतो आनंदानं भरावी तुझी वटी
पुना येकदा जलम घ्यावा तुजे पोटी
तुझ्या चरनी ठेवून माया धरावं तुझं पाय
तवा मले पायामंदी दिसती माझी माय
‍

-कवी नारायण सुर्वे
गायक - जितेंद्र जोशी

November 15, 2010

आई.....

पहिला शब्द जो मी उच्चारला,
पहिला घास जीने मला भरवला,
हाताचे बोट पकडून जीने मला चालवले,
आजारी असताना जीने रात्रंदिवस काढले.

आठवतय मला,
चूकल्यावर धपाटा घातलेला,
भूक लागली आहे सांगताच,
खाऊचा डब्बा पुढे केलेला.

अनेकदा तिने,
जेवणासाठि थांबायचे,
आणि मी मात्र न सांगताच,
बाहेरून खाऊन यायचे.

कधी कधी रागाच्या भरात,
उलटहि बोललोय,
आणि मग चूक समजल्यावर,
ढसा ढसा रडलोय.

तिने सुद्धा माझे बोलणे,
कधीच मनावर नाहि घेतले,
मागाहून घालवलेले माझे अश्रू,
पदराने पुसून टाकले.

माझी स्तुती करताना,
ती कधीच थांबत नाहि,
अन माझा मोठेपणा सांगतान ,
तिच्या आनंदाला पारावर ऊरत नाहि.

माझा विचार करणे,
तिने कधिच सोडले नाहि,
माझ्यावर प्रेम करण्याला,
कधीच अंत नाही.

मी सुद्धा ठरवले आहे,
तिला नेहमी खुश ठेवायचे,
कितीहि काहि झाले तरी,
तिला नाहि दुखवायचे.

आईची महानता सांगायला,
शब्द कधीच पूरणार नाहि,
तिचे उपकार फ़ेडायला,
सात जन्म सुद्धा शक्य नाहि.

देवाकडे एकच मागणे,
भरपूर आयुश्य लाभो तिला,
माझ्या प्रत्येक जन्मी,
तिचाच गर्भ दे मजला.....


October 05, 2009

नास्तिक - संदीप खरे

एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो

तेव्हा खर तर गाभा-यातच भर पडत असते

की कोणीतरी आपल्यापुरता सत्याशी का होईना,

पण प्रामाणिकपणे चिकटुन राहिल्याच्या पुण्याईची !

एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो

तेव्हा होते निर्माण

देवाने आपला आळस झटकून देवळाबाहेर येण्याची !

एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो

तेव्हा को-या नजरेने पाहत राहतो

सभोवतालच्या हालचाली, भाविकाच्या जत्रा…

कोणीतरी स्वत:चे ओझे , स्वत:च्याच पायावर

साभाळत असल्याचे समाधान लाभते देवलाच !

म्हणून तर एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो

तेव्हा देवाला एक भक्त कमी मिळत असेल कदचित !

पण मिळते आकठ समाधान एक सहकारी लाभल्याचे

देऊळ बद झाल्यावर एक मस्त आळस देउन

बाहेर ताटकळलेल्या नास्तिकाशी गप्पा मारता मारता

देव म्हणतो, " दर्शन देत जा अधुन मधुन……..

तुमचा नसेल विश्वास आमच्यावर,

पण आमचा तर आहे ना ! "

देवळाबाहेर थाबलेला एक खरा खुरा नास्तिक

कटाळलेल्या देवाला मोठ्या मिन्नतवारिने पाठवतो देवळात

तेव्हा कुठे अनंत वर्षे आपण घेऊ शकतो दर्शन

अस्तिकत्वाच्या भरजरी शालीत गुदमरलेल्या देवाचे….

एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो…………..

September 15, 2009

सिवाजी न होते तो , सुन्नत होती सबकी

राखी हिन्दुवानी, हिन्दुवानको तिलक राख्यो |
अस्मृती पुराण राखे वेदविधि सुनी मैं ||
राखी रजपुती , रजधानी राखी राजन की |
धरामे धर्म राख्यो , राख्यो गुन गुनी मैं ||
भूषण सुकवि , जीती हद्द मरह्टट्न की |
देस देस कीर्ति , बरवानी तव सुनी मैं ||
साही के सपूत , सिवराज समशेर तेरी |
दिल्ली दल दाबी कै, दिवाल राखी दुनी मैं ||
वेद राखे विदित , पुराण राखे सारयुत |
रामनाम राख्यो , अति रसना सुघर मैं ||
हिन्दुन की चोटी, रोटी राखी है सिपहीन की |
कान्दे मैं जनेऊ राखे , माला राखी गर मैं ||
मिडी राखे मुगल , मरोरी राखे पातसाह |
बैरीपिसी राखे , बरदान राख्यो कर मैं ||
राजन की हद्द राखी , तेगबल सिवराज |
देव राखे देवल , स्वधर्म राख्यो घर मैं ||
देवल गिराविते , फिराविते निसान अली |
ऐसे डूबे रावराने , सबी गए लबकी ||
गौर गणपती आप , औरनको देत ताप |
आपनी ही बार सब , मारी गये दबकी ||
पीरा पैगंबर , दिगंबर दिखाई देत |
सिद्ध की सिदधाई गई , रही बात रब की ||
कासी की कला जाती, मथुरा मस्जिद होती |
सिवाजी न होते तो , सुन्नत होती सबकी ||

- कविराज भूषण.
{{ हे! शहाजींचे वीर पुत्र शिवाजी महाराज! तुम्ही आपल्या तलावारीने हिंदुत्वाचे संरक्षण केले.हिन्दुंचा तिलक राखला आहे. श्रुति, स्मृति व पुराणातील आचारधर्माचे संरक्षण केले. राजपुतांचा क्षात्र धर्म व राजांच्या राजधान्यांना आपनाच स्थैर्य प्राप्त करून दिले आहे. पृथ्वीवर धर्म आपणच राखला आहे. गुणिजनांमधील श्रेष्ठ गुणांचे अस्तित्व आपल्यामुळेच राहिले आहे. आपण महाराष्ट्राची महानता वाढवली आहे व महाराष्ट्राला श्रेष्ठता प्राप्त करून दिली आहे. आपली किर्ती दिगंतात पसरलेली आहे. आपल्या दिव्या तलवारीने दिल्लीपतीच्या सेनेचा पराभव करून, जगात हिंदुंच्या मान मर्यादांचे संरक्षण केले आहे. वेदांचे आणि पुराणांचे सामर्थ्य आपल्यामुळेच टिकून राहिले आहे. आपल्यामुळेच भाविकांच्या जिभेवर रामनाम अस्तित्व शिल्लक आहे. हिंदुंच्या पवित्र शिखेला व सैनिकांच्या भाकरीला आपल्यामुळेच संरक्षण मिळाले आहे. यज्ञोपवितांना व पवित्र जपमाळांना आपण वाचाविले आहे. मोगलांच्या सामंतांचाच नव्हे, तर बादशाहचाही आपण धुव्वा उडविलात. निग्रहानुग्रहाचे सामर्थ्य आपण प्रकट केले आहे. देवळातील देव व घरामधील धर्म केवळ आपल्यामुळेच शिल्लक राहिला आहे. सभोवाताली सर्व यवनांचे कार्य अक्षुण्णपणे चालू असता व यवन सैनिकांनी मंदिरे पाडून त्या जागी अल्लाचा ध्वज फडकविला असता, राजे महाराजे भयग्रस्त व पतित होऊन तोंडदेखील बाहेर काढत नव्हते. थोडेसे पुजविधन चुकले तर भक्तांनाच ताप देणाय्रा देवी, गणपती आदि देवदेवतांना आपल्यावरील या यावनी संकटांचा प्रतिकार करणे अशक्य वाटून ते लपून बसले होते. सिद्धांची सिद्धि समाप्त होवून जिकडे तिकडे पीर, पैगंबर, फकीर, अवलिया यांचेच साम्राज्य पसरलेले होते. अशा स्थितीत जर शिवाजी महाराज झाले नसते, तर काशी कलाहीन झाली असती,मथुरेला मशीद उभा राहीली असती अणि हिन्दुंची सुन्ता झाली असती}
अश्या एका महान युगप्रवर्तकाच्या भुमित जन्म घेतल्याने खरच अयुष्याचे सार्थक झाले!

July 31, 2009

दमलेल्या बापाची कहाणी

मागच्या रविवारी म्हणजे २६ जुले ला आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमात ही कविता ऐकली आणि मन सुन्न झाल.

कोमेजून निजलेली एक परी राणी
उतरले तोंड,डोळा सुकलेले पाणी
रोजचेच आहे सारे काही आज नाही
माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही
झोपेतच घेतो तुला आज मी कुशीत
निजेतच तरी पण येशील खुशीत
सांगायाचे आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बापाची ही कहाणी तुला....
ना ना ना ना ना॥ ना ना ना ना ना....

आटपाट नगरात गर्दी होती भारी
घामाघूम राजा तरी लोकलची वारी
रोज सकाळीच राजा निघताना बोले
गोष्ट सांगायाचे काल राहूनिया गेले
जमलेच नाही काल येणे मला जरी
आज परि येणार मी वेळेतच घरी
स्वप्नातल्या गावामध्ये मारू बघ खेळी
खर्याखुर्या परीसाठी गोष्टीतली परी
मांडीन मी थकलेल्या हातांचा झुला
दमलेल्या बापाची ही कहाणी तुला....
ना ना ना ना ना॥ ना ना ना ना ना...

(संदीपचा आवाज) गद्य:
ऑफिसात उशीरा मी असतो बसून
भंडावले डोके गेले कामात बुडून
तास-तास जातो खाल मानेने निघून
एक-एक दिवा जातो हळूच विझून
अशा वेळी काय सांगू काय-काय वाटे
आठवासोबत पाणी डोळ्यांतून दाटे
वाटते की उठूनिया तुझ्या पास यावे
तुझ्यासाठी मी पुन्हा लहानगे व्हावे
उगाचच रूसावे नि भांडावे तुझ्याशी
चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी

(सलीलचा आवाज) पद्य:
उधळत खिदळत बोलशील काही
बघताना भान मला उरणार नाही
हसूनिया उगाचच ओरडेल काही
दुरूनच आपल्याला बघणारी आई
तरीसुद्धा दोघेजण दंगा मांडू असा
क्षणा-क्षणावर ठेवू खोडकर ठसा
सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बापाची ही कहाणी तुला....
ना ना ना ना ना ना ना ना ना....

(संदीपचा आवाज) गद्य:
दमल्या पायाने जेव्हा येईल जांभई
मऊ-मऊ दूध भात भरवेल आई
गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी
सावरीच्या उशीहून मऊ माझी कुशी

(सलीलचा आवाज) पद्य:
कुशी माझी सांगताहे ऐक बाळा काही
सदोदित जरी का मी तुझ्या पास नाही
जेवू खाऊ नाहू माखू घालतो ना तुला
आईपरी वेणी फणी करतो ना तुला
तुझ्यासाठी आईपरी बाबासुद्धा खुळा
तोही कधी गुपचूप रडतो रे बाळा
सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बापाची या कहाणी तुला....
ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना....

(संदीपचा आवाज) गद्य:
बोळक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात
आणि पहिल्यांदाच घेतलास जेव्हा तोंडी मऊ भात
आई म्हणण्याआधीसुद्धा म्हणली होतीस बाबा
रांगत रांगत घेतलास जेव्हा घराचा तू ताबा
लुटू-लुटू उभं रहात टाकलंस पाऊल पहिलं
दूरचं पहात राहिलो फक्त,जवळ पहायचंच राहिलं

(सलीलचा आवाज) पद्य:
असा गेलो आहे बाळा पुरा अडकून
हल्ली तुला झोपेतच पहातो दुरून
असा कसा बाबा देव लेकराला देतो
लवकर जातो आणि उशीरानं येतो
बालपण गेले तुझे-तुझे निसटून
उरे काय तुझ्या-माझ्या ओंजळीमधून
जरी येते ओठी तुझ्या माझ्यासाठी हसे
नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे
तुझ्या जगातून बाबा हरवेल का गं
मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं
सासुराला जाता-जाता उंबरठ्यामध्ये
बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये
ना ना ना ना ना ना ना ना ना ना...
--- संदीप खरे।


February 10, 2008

आई

आई साठी कसे लिहू,
आई साठी पुरतील एवढेशब्द नाहीत कोठे,
आई वरती लिहीण्याइतपतनाही माझे व्यक्तिमत्व मोठे.....
आई तू उन्हामधली सावली
आई तू पावसातली छत्री,
आई तू थंडीतली शालआता यावीत दु:खे खुशाल.......
आई म्हणजे मंदिराचा उंच कळस
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस,
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी
आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं ठंडगार पाणी.....
आई म्हणजे आरतीत वाजवावीअशी लयबध्द टाळी,
आई म्हणजे वेदनेनंतरचीसर्वात पहिली आरोळी........