July 19, 2010

शिवचरित्र - बाबासाहेब पुरंदरे व्याख्यानमाला

जर तुम्हाला बाबासाहेब पुरंदरे ची व्याख्यानमाला हवी असेल इथे पहा
धन्यवाद् पुष्पराज

July 15, 2010

तो आणि ती भाग..१२ --बॉंबस्फोटाने पाडला 'व्हॅलेंटाइन'चा नवा पायंडा

बॉंबस्फोटानं त्यांचा "व्हॅलेंटाइन डे'चा प्लॅन उधळून लावला. पण त्याचं दुःख नव्हतं. येत्या रविवारी "व्हॅलेंटाइन डे' साजरा करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. सामाजिक जबाबदारीचं भान ठेवून मृतांना श्रद्धांजली वाहिली आणि रक्तदान केलं. कारण म्हणतात ना, रक्तदान हेच जीवनदान!

तो "जेएम रोड'वर मित्रांसोबत गप्पा छाटत बसला होता. अगदी निवांत. हातात आइस्क्रीमचे कोन. तोंडात "व्हॅलेंटाइन डे'च्या गप्पा. यंदा "व्हॅलेंटाइन डे'ला खूप जल्लोष करायचा, भरपूर फिरायचं, पिझ्झा-बर्गर हादडायचे... असा ढोबळमानानं प्लॅन. त्याचा हलकासा आराखडा आखण्यात येत होता. एवढ्यात फोन "नटरंग'चं गाणं गुणगुणू लागला. दुसऱ्या टोकाला ती होती. थोडी घाबरलेली. थोडी भेदरलेली. ""अरे तू आहेस कुठे? तुला माहीत आहे काय, शहरात काय घडलंय ते,'' ती कापऱ्या आवाजात म्हणाली. त्याला तिच्या बोलण्याची दिशा समजेना. ""मी जेएम रोडवर आहे. मित्रांसोबत. उद्याचा इव्हेंट प्लॅन करतोय,'' त्यानं खुलासा केला. ""अरे, ते जाऊ दे चुलीत. शहरात बॉंबस्फोट झालाय. कोरेगाव पार्कातील जर्मन बेकरी पूर्णपणे उद्‌ध्वस्त झाली आहे. पाच विदेशी महिलांसह आठ जण मृत्युमुखी पडलेत. पप्पांना "सकाळ'चा एसएमएस आला होता. सर्व चॅनेल्सवर बातमी झळकतेय. आणि तू फिरतोय गावभर मूर्खासारखा!'' तो भीतीनं नखशिखान्त शहारला. तिचे शब्द काळीज चिरत होते. हातातलं अवसान गळालं. त्यानं आइस्क्रीम कचरापेटीत फेकलं. पुण्यात दहशतवादी हल्ला.... त्याच्या कल्पनेपलीकडचा विषय. बोलताना तो कायम अभिमानानं सांगायचा, ""अरे, भारतात कुठंही दहशतवादी हल्ला होऊ शकतो; पण पुण्यात होणार नाही. आपलं पुणं तसं शांत.'' कधी कधी थट्टा-मस्करीच्या सुरात तो म्हणायचा, ""तसंही देशात कुठेही बॉंबस्फोट झाले, तरी संशयित पुण्यात सापडतात. तेव्हा पुण्यात असं काही शक्‍यच नाही.''
बॉंबस्फोटाची बातमी कळताच सगळा प्रसंग डोळ्यांसमोर तरळून आला. त्याचा आवाज येत नसल्यानं ती "हॅलो!!! हॅलो!!!' करीत राहिली. ""होय मला ऐकू येतंय,'' तो भानावर येत म्हणाला. ""अरे, ऐकतोय काय बैलासारखा. घरी पळ. लवकर. आताच्या आता. आणि हो... घरी गेल्यावर मला फोन कर...'' ती ओरडली. त्यानं मित्रांना ही बातमी दिल्यावर ते हादरलेच. सर्वांच्या भयग्रस्त चेहऱ्यांवर दहशतीची छाप दिसत होती. शहरात इतरही ठिकाणी स्फोट होणार तर नाही ना, या शंकेचं मरणभय त्यांच्यावर स्वार झालं. त्यानं घरी गेल्यावर लागलीच तिला फोन केला. खासगी वृत्तवाहिन्यांवर बॉंबस्फोटाचं "फुटेज' दाखविण्यात येत होतं. मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या संख्येबाबत वाहिन्यांमध्ये स्पर्धा लागली होती. त्यानं बिछान्याला शिवण्याआधी ग्रुपच्या मित्र-मैत्रिणींना "व्हॅलेंटाइन डे कॅन्सल्ड. मीट इन फ्रंट ऑफ बालगंधर्व,' असा एसएमएस केला.

सकाळी रस्त्यांवर प्रचंड शुकशुकाट होता. त्याला यायला थोडा विलंब झाला. तोपर्यंत ग्रुपच्या मित्र-मैत्रिणी "बालगंधर्व'समोर तिष्ठत बसल्या होत्या. तो आल्यावर त्यांनी "व्हॅलेंटाइन डे' सेलिब्रेट न करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं. पण त्याला काही जणांचा विरोध होता. प्रिन्सेसही म्हणाली, ""अरे, संध्याकाळपर्यंत सर्व वातावरण निवळेल. आपण उगाच चिंता करतोय.'' पण आपल्या पुण्यात बॉंबस्फोट झालाय आणि आपण सेलिब्रेशन करायचं, तेही "व्हॅलेंटाइन डे' सेलिब्रेशन? कुणाच्याही बुद्धीला ते पटणारं नव्हतं. पुन्हा तोच धागा पकडून प्रिन्सेस त्याच्याकडे बघत म्हणाली, ""मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं होतं; पण अशा गंभीर वातावरणात ते शक्‍यही नाही. ठीक आहे... तुम्ही म्हणता तसं करू यात.'' येणाऱ्या रविवारी "व्हॅलेंटाइन डे' सेलिब्रेट करू; पण बॉंबस्फोटानंतर घाबरून उंदरासारखं बिळात लपून बसायचं, म्हणजे दहशतीला हातभारच लागेल. दहशतवाद्यांचा तोच उद्देश आहे. तेव्हा आपल्या परीनं बॉंबस्फोटग्रस्तांना मदत करायची. त्यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात जाऊन मृतांसाठी प्रार्थना केली. पाच मिनिटं मौन धारण केलं. सामाजिक जबाबदारीचं भान ठेवून "ससून'मध्ये रक्तदानही केलं. संध्याकाळी ते पुन्हा "बालगंधर्व'समोर भेटले. दहशतवादाच्या उग्र स्वरूपावर भीषण चर्चा रंगली. मनातली गरळ ओकून झाल्यावर घरी जाताना तो तिला म्हणाला, ""मी तुझ्यासाठी एक कविता लिहिली होती. व्हॅलेंटाइन स्पेशल.'' रात्री झोपण्याआधी कॉटवर पहुडत टेबललॅम्पच्या मंद प्रकाशात तिनं कागदाची घडी उघडली.

When I seat behind the window,
And look at the Moon,
I feel your smile for a while.
When I roam on the terrace,
And look at the stars,
I smell your presence... a true essence.
When I walk down the road,
And look at the rainbow,
I catch tears that form layers in your eyes.
When I desperately feel to go to bed,
And close my eyes,
I hear the silence... your precious silence.
Happy Valentine Day

(क्रमशः)

पावनखिंडीचा इतिहास अनुभवा

सिद्दी जोहरच्या वेढ्यातून शिवाजी महाराजांना पन्हाळगडापासून विशाळागडापर्यंत सुखरुप पोहोचवण्यात नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. जोहरच्या सैन्याला बाजीप्रभूंनी प्राणाची बाजी लावत पावनखिंडीत रोखून धरलं होतं. लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जिवंत राहिला पाहिजे ही जाणीव असणाऱ्या बाजीप्रभू देशपांडे यांच्या पावनखिंड लढतीला यंदा ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक स्मृतींना उजाळा देण्यासाठी पन्हाळगड ते पावनखिंड-विशाळगड मोहीम आयोजित करण्यात आली आहे. यावेळी बाजीप्रभूंनी घडवलेला इतिहास व्याख्यानाद्वारे पुन्हा जिवंत करण्यात येणार असून मोहीमेत सहभागी होणाऱ्यांना हा अनुभव घेता येईल. डॉ. अमर अडके हे पावनखिंडीतील तो रणसंग्राम कथन करतील. २५ ते २८ जुलै दरम्यान ही मोहीम आखण्यात आली असून शिवाजी महाराजांची पालखीही नेण्यात येणार आहे. यावेळी ज्योतिबा तसेच महालक्ष्मी देवीचे दर्शनही घेता येणार आहे. संपूर्ण मोहिमेचा खर्च १४०० रुपये असून यामध्ये मुंबई ते मुंबई प्रवास, राहण्या-खाण्याची व्यवस्था यांचा समावेश आहे.

पदभ्रमण मोहीम

'भरारी' या गिर्यारोहण संस्थेतफेर् नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या ३५० व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आणि त्यांच्या शूर सहकाऱ्यांना आदरांजली वाहण्यासाठी एक पावसाळी पदभ्रमण मोहिम आयोजित करण्यात आली आहे. २३ ते २७ जुलैदरम्यान होणाऱ्या या मोहिमेस ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ आप्पा परब यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. बाजीप्रभूंनी ज्या ठिकाणी इतिहास घडवला अशा पावनखिंडीत, पन्हाळगड ते विशाळगड या ठिकाणी ही पदभ्रमण मोहिम होईल. संपर्क : ९७०२००१६६१, ९८२१६३६२४३

मान्सून प्लॅनर

बीएनएचएस

११ जुलै नॅशनल पार्कमधील सलीम अली पॉइंट येथे नेचर वॉक

१८ जुलै माळशेज घाट येथे मान्सून ट्रेल

२५ जुलै माथेरान ट्रेक

१ ऑगस्ट पेठ ट्रेक

८ ऑगस्ट कर्नाळ्याला नेचर ट्रेक

८ ऑगस्ट नॅशनल पार्कमधील सिलोंदा ट्रेल येथे नेचर वॉक

२२ ऑगस्ट तिकोना किल्ल्यावर ट्रेक

२७-२९ ऑगस्ट नाणंज येथील बस्टर्ड सँच्युरीमध्ये नेचर कॅम्प

२८-२९ ऑगस्ट राजमाची येथे नेचर ट्रेक

२९ ऑगस्ट रोटरी क्लबसोबत मान्सून ट्रेल

संपर्क : २२८२१८११ 

तांदूळवाडी ट्रेक

२५ जुलै रोजी सफाळे इथल्या तांदूळवाडी ट्रेकचं आयोजन केलं आहे.

संपर्क : विनय पानसरे : ९८१९६०१७५१,

विनायक साकरे : ९८३३८११८८७

July 09, 2010

आय.टी. दिंडी

नमस्कार आय टी वाल्यांनो,

आता सामिल व्हा आय.टी. दिंडी मध्ये पहा वारी.ओर्ग