October 05, 2009

नास्तिक - संदीप खरे

एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो

तेव्हा खर तर गाभा-यातच भर पडत असते

की कोणीतरी आपल्यापुरता सत्याशी का होईना,

पण प्रामाणिकपणे चिकटुन राहिल्याच्या पुण्याईची !

एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो

तेव्हा होते निर्माण

देवाने आपला आळस झटकून देवळाबाहेर येण्याची !

एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो

तेव्हा को-या नजरेने पाहत राहतो

सभोवतालच्या हालचाली, भाविकाच्या जत्रा…

कोणीतरी स्वत:चे ओझे , स्वत:च्याच पायावर

साभाळत असल्याचे समाधान लाभते देवलाच !

म्हणून तर एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो

तेव्हा देवाला एक भक्त कमी मिळत असेल कदचित !

पण मिळते आकठ समाधान एक सहकारी लाभल्याचे

देऊळ बद झाल्यावर एक मस्त आळस देउन

बाहेर ताटकळलेल्या नास्तिकाशी गप्पा मारता मारता

देव म्हणतो, " दर्शन देत जा अधुन मधुन……..

तुमचा नसेल विश्वास आमच्यावर,

पण आमचा तर आहे ना ! "

देवळाबाहेर थाबलेला एक खरा खुरा नास्तिक

कटाळलेल्या देवाला मोठ्या मिन्नतवारिने पाठवतो देवळात

तेव्हा कुठे अनंत वर्षे आपण घेऊ शकतो दर्शन

अस्तिकत्वाच्या भरजरी शालीत गुदमरलेल्या देवाचे….

एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो…………..