February 10, 2008

आई

आई साठी कसे लिहू,
आई साठी पुरतील एवढेशब्द नाहीत कोठे,
आई वरती लिहीण्याइतपतनाही माझे व्यक्तिमत्व मोठे.....
आई तू उन्हामधली सावली
आई तू पावसातली छत्री,
आई तू थंडीतली शालआता यावीत दु:खे खुशाल.......
आई म्हणजे मंदिराचा उंच कळस
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस,
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी
आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं ठंडगार पाणी.....
आई म्हणजे आरतीत वाजवावीअशी लयबध्द टाळी,
आई म्हणजे वेदनेनंतरचीसर्वात पहिली आरोळी........

No comments: