आयुष्यच्या अल्बममध्ये आठवणींचे फोटो असतात पण आणखी एक कॉपी काढायला निगेटिव्हज मात्र शिल्लक नसतात.
वरवर पाहता खूप सुंदर status आहे हा.... पण नीट विचार केला तर जाणवेल की मनुष्य नेहमीच आठवणींवर जगत आलेला आहे. आयुष्यात जे बरे वाईट घडत आले त्यावर विचार करत बसून आपलं उरलेलं आयुष्य समाधानत घालवण्या ऐवजी एकतर झुरण्यात किंवा स्वत:ला दोष देण्यात घालवत असतो.
अल्बम्स आपण नेहमीच पाहत असतो आणि फोटोतील आठवणींवर कधी गालावर हसू तर कधी नकळत अश्रू ओघळू लागतात. आठवणी जपाव्यात पण त्यांना नेहमी कुरवाळत बसू नये. अशामुळे तुम्हाला नवीन क्षण उपभोगायची इच्छाच उरणार नाही. आयुष्यात घडलेलं एकतर भयंकर होतं किंवा स्वर्ग सुख असा मनावर ताण आणून जगत राहणे म्हणजे आयुष्यात भविष्यात येणा-या क्षणांना बांध घालण्यासारखेच आहे.
मी अजिबात म्हणत नाही की आठवणी जपू नका म्हणून पण त्यांची पुन्हा आणखी एक कॉपी काढायची गरजच तुम्हाला कधी पडू नये याचा विचार करा. त्यापेक्षा कॅमेरा उचला आणि नवीन फोटो काढा. निगेटिव्हज खराब होतात पण अनुभवलेले क्षण कधीच पुसले जात नाहीत. ना कागदावरुन ना मनातून..